Sponsored Links


Maitri Poems in Marathi Language. Best Marathi Poem on Friendship, Dosti for Whatsapp and Facebook. Latest Marathi Kavita, Shayari and Greetings Collection...


मैत्री

अवचित एखाद्या कातर क्षणी
सहज ओळखीचे होते कोणी

नसतो कुठलाही ऋणानुबंध
तरीही बांधला जातो बंध

आवडी निवडी जुळतात कधी
मतमतांतरे ही घडतात कघी

तरीही अलगद पडतात रेशीमगाठी
गुणांदोशासह स्विकारावे मैत्रीसाठी 

मैत्रीत कसले आलेत राग लोभ
मैत्रीत हक्काचे असावेत लोक

न सांगता मनीचे गुज उमजते ती मैत्री
न मागता सुखाची वाट दाखवते ती मैत्री

इवल्याशा सुखात मनभर आनंद देते मैत्री
नकळत चुकीला क्षमा करते ती मैत्री

न भेटता ही दृढबंध होत जाते मैत्री
जिवनातला निखऴ आनंद होते मैत्रीSponsored Links


Post a Comment Blogger

 
Top